Narayana Murthy AI Warning 2026: भारतीय युवकांसाठी करिअरचा टर्निंग पॉइंट की धोक्याची घंटा? | Image Via © Timesofindia.com
AI हा word आता प्रत्येक तरुणाच्या discussion madhe आहे. Social Media, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये एकच प्रश्न फिरतो आहे. AI मुळे नोकऱ्या जाणार का?
Specifically IT आणि white collar space made काम करणाऱ्यांना ही चिंता अधिक आहे. अशातच Infosys चे सहसंस्थापक Narayana Murthy यांनी AI बद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
त्यांची मुलाखत Moneycontrol च्या special कार्यक्रमात झाली. त्यांच्यासोबत Aditya Puri देखील उपस्थित होते. अनेक न्यूज वेबसाइट्सनी या मुलाखतीवर 400 – 500 शब्दांचे articles लिहिले. पण बहुतेकांनी केवळ काही कोट्स दिले आणि विषय संपवला.
खरे पाहिले तर हा विषय इतकाच साधा नाही. AI हा केवळ Technical बदल नाही. तो काम करण्याच्या process madhe मोठा बदल आहे. या article madhe आपण Murthy यांचे खरे मत, 2026 मधील वास्तविक आकडे, भारतीय IT क्षेत्रातील बदल, आणि युवकांनी काय करावे याचा सखोल आढावा घेणार आहोत.
Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत Narayana Murthy यांनी स्पष्ट सांगितले की AI ही assistive technology आहे. ती माणसाची जागा घेण्यासाठी नाही. ती माणसाला अधिक उत्पादक बनवण्यासाठी आहे.
त्यांनी सांगितले की त्यांनी स्वतः जनरेटिव AI वापरून पाहिले. त्यांनी व्याख्यानाची तयारी करण्यासाठी AI चा वापर केला. त्यांना जाणवले की ज्याचे विचार स्पष्ट आहेत त्याला AI अधिक चांगले परिणाम देते. त्यांचे विधान simple होते. AI हे साधन आहे. अंतिम निर्णय आणि सर्जनशीलता माणसाकडेच राहते.
त्याच कार्यक्रमात Aditya Puri यांनीही म्हटले की पूर्ण automation लगेच होणार नाही. Human आणि AI यांचे combination पुढील अनेक वर्षे चालेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. बदल होणार आहे. पण तो हळूहळू होणार आहे.
हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही उद्योग नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी होण्याचा इशारा दिला आहे. Vinod Khosla यांनी भारतीय IT सेवा क्षेत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो असे मत व्यक्त केले आहे.
Geoffrey Hinton यांनी AI मुळे आर्थिक असमानता वाढू शकते असे सांगितले आहे. But Murthy यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते इतिहासाचा दाखला देतात. संगणक आले तेव्हा भीती होती. इंटरनेट आले तेव्हा देखील भीती होती. पण या दोन्ही तंत्रज्ञानांनी लाखो नवीन नोकऱ्या निर्माण केल्या.
Routine कामे automate झाली. पण नवीन कौशल्यांची मागणी वाढली. आजही तीच परिस्थिती आहे.
भीती कमी करण्यासाठी डेटा महत्त्वाचा आहे. NASSCOM च्या अंदाजानुसार 2026 पर्यंत भारतात AI संबंधित नोकऱ्यांची मागणी 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाखांपेक्षा जास्त होणार आहे.
सध्या भारतातील 5.4 Lakhs IT व्यावसायिकांपैकी केवळ 16% लोक AI Skiils Madhe सुसज्ज आहेत. म्हणजेच मोठी Skill chi तूट आहे.
AI आणि ML संबंधित सुमारे 51% भूमिका अजूनही रिक्त आहेत. India Skills Report 2026 नुसार 2027 पर्यंत भारतातील AI talent pool 1.25 lakhs पोहोचेल. 90% जास्त भारतीय workers दररोज GenAI tools वापरत आहेत.
McKinsey च्या अहवालानुसार AI योग्य पद्धतीने वापरणाऱ्या कंपन्यांना 30 ते 50% Production क्षमता वाढ दिसते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. AI मुळे नोकऱ्या संपत नाहीत. नोकऱ्यांचे format बदलते.
AI सध्या खालील कामांमध्ये वेगाने वापरले जात आहे.
| कामाचा प्रकार | AI चा प्रभाव | मानवी भूमिका |
|---|---|---|
| Routine Data Entry | जास्त | कमी |
| Basic Coding | मध्यम ते जास्त | तपासणी आणि सुधारणा |
| Report Generation | जास्त | गुणवत्ता नियंत्रण |
| Strategic Planning | कमी | जास्त |
| Creative Work | मध्यम | कल्पकता आणि निर्णय |
Entry level coding आणि data entry भूमिका कमी होऊ शकतात. पण AI oversight, prompt engineering, AI ethics, cybersecurity, cloud integration या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. NASSCOM या प्रक्रियेला job compression असे म्हणते. Job collapse नाही.
Infosys ने अलीकडेच enterprise AI solutions वर मोठा भर दिला आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय AI कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.
हे दाखवते की Murthy यांचा सल्ला केवळ भाषणापुरता नाही. तो उद्योगात प्रत्यक्ष लागू केला जात आहे. Murthy यांनी स्वतः AI वापरून उत्पादकता वाढवली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की AI वापरणारा स्मार्ट माणूस अधिक चांगले परिणाम मिळवतो.
यातून एक मोठा संदेश मिळतो. AI शिकणे हा पर्याय नाही. ती गरज आहे.
केवळ भीती बाळगून काही होणार नाही. खालील 5 स्टेप योजना प्रत्यक्ष उपयोगी ठरू शकते.
ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारखी साधने वापरून पाहा. रोजच्या कामात त्यांचा वापर करा.
AI कडून योग्य उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. ही मोठी कौशल्य आहे.
उदाहरणार्थ AI आधारित resume analyzer तयार करा. किंवा डेटा analysis tool बनवा.
फक्त कोडिंग पुरेसे नाही. Finance, healthcare, marketing यांसारख्या क्षेत्रात AI वापरण्याची क्षमता महत्त्वाची आहे.
Online courses, certification programs, open source projects यात सहभागी व्हा.
Murthy यांनी शिस्त आणि मेहनत यावर भर दिला आहे. त्यांचा 70 तासांच्या कामाच्या आठवड्याचा विचार प्रसिद्ध आहे. तो मुद्दा वादग्रस्त असू शकतो. पण मेहनतीचे महत्त्व नाकारता येत नाही.
अनेक उत्पादने AI नावाखाली विकली जातात. पण प्रत्यक्षात ती पारंपरिक सॉफ्टवेअर असतात. Murthy यांनी सांगितले की अति उत्साह आणि अति भीती दोन्ही चुकीचे आहेत.
International स्तरावरील अहवाल सांगतात की AI मुळे एकूण रोजगार कोसळलेला नाही. पण भूमिका बदलल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. बदल स्वीकारा. पण अंधानुकरण करू नका.
Social media वर या विषयावर मोठी चर्चा झाली. अनेकांनी Murthy यांचे समर्थन केले.
लोकांनी काही मुद्दे वारंवार मांडले. Some of them are as follows:
काहींनी शंका व्यक्त केली. पण बहुसंख्य प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. विशेषतः startup आणि IT समुदायात.
2026 मध्ये AI debate अधिक तीव्र झाली आहे. Indian IT sector साठी हा संक्रमणाचा काळ आहे. Outsourcing आणि BPO क्षेत्रात automation वाढत आहे.
पण AI development, data science, cybersecurity, cloud integration या क्षेत्रात मागणी वाढत आहे. इतिहास सांगतो की बदल स्वीकारणारे लोक पुढे जातात. बदलाला विरोध करणारे मागे पडतात.
Narayana Murthy यांचा AI warning हा घाबरवण्यासाठी नाही. तो Aware करण्यासाठी आहे. AI तुमच Job घेणार नाही. पण जर तुम्ही शिकणे थांबवले तर स्पर्धा तुम्हाला मागे टाकेल.
भारतीय युवकांसाठी ही भीतीची वेळ नाही. ही तयारीची वेळ आहे. AI हे साधन आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे.
माझ्या मते पुढील पाच वर्षे निर्णायक असतील. जो आज शिकेल तो उद्या नेतृत्व करेल. जो आज थांबेल तो उद्या मागे राहील. शिस्त, मेहनत आणि सतत शिक्षण या तीन गोष्टी भविष्यातील यश ठरवतील.
Share This Post